(DEMO)BMC clerk recruitment 2024 | बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहाय्यक (लिपिक)पदाच्या 1846 जागांसाठी भरती 2024

माहिती शेअर करा

BMC clerk recruitment 2024

Table Of Content

BMC clerk recruitment 2024:- बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती नुसार कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एकुण 1846 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवार या रिक्त पदांंसाठी अर्ज करु शकतात.

BMC clerk recruitment 2024

बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846जागांची भरती 2024
नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या बृहमुंबई महानगरपालिका च्या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 1846जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार ” कार्यकारी सहायक (लिपिक)” या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सदर नोकरी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

ऑनलाईन अर्जाची लिंक व सदर नोकरी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीची PDF आपल्याला खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .तसेच परीक्षेपूर्वी
https://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपले प्रवेशपत्र (Admit कार्ड) डाउनलोड करू शकतात.
अर्ज करतांना उमेदवाराने घ्यावयाची काळजी व गैरसोय होऊ नये म्हणून काही सूचना यांची यादी खाली देण्यात आलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने त्या सूचना व माहिती व्यवस्थित वाचून योग्य ती काळजी घ्यावी व आपला अमूल्य वेळ वाचवावा.

अधिकृत जाहिरात क्रमांक :- सीएमए -०४२३/ सीआर

पदाचे नाव :- कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम:लिपिक)

रिक्त पदसंख्या :- 1846 पदे

bmc recruitment 2024 qualification

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, पदवीधर.

वयोमर्यादा (वयाची अट ):-

  • अराखीव / खुला प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष
  • राखीव / मागास प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
  • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
  • खेळाडू प्रवर्ग : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
  • अंशकालीन पदवीधर (सुशिक्षित बेरोजगार) : किमान 18 वर्ष ते कमाल 55 वर्ष
  • दिव्यांग : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष
    • (वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग उमेदवार संबंधित पदावर काम करू शकेल याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक.)
  • अनाथ : किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष
  • स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य : किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज शुल्क (फी):-

  • अराखीव / खुला प्रवर्ग : 1000/-₹
  • राखीव / मागास प्रवर्ग : 900/-₹

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-11 ऑक्टोबर 2024

वेतनमान :- 25500/-₹ ते 81100/-₹

अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :-

  • लिस्ट

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा :-

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 ऑक्टोबर 2024

महत्वाच्या लिंक्स :-

bmc clerk recruitment 2024 official website

bmc clerk recruitment 2024 pdf download

bmc clerk recruitment 2024 advertisement pdf

bmc clerk recruitment 2024 apply online

महत्वाच्या सूचना

बृहमुंबई महानगरपालिका मध्ये “लिपिक” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना आणि माहिती

  1. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  2. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज दिनांक 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत करावा.आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेले आवेदन अर्ज नोकरी विभागाकडून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  3. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आसपासच्या दिवसांमध्ये अर्ज सादर करावयाच्या अधिकृत सर्व्हरवर लोड येऊन सर्व्हर डाउन जाऊ शकते म्हणून उमेदवाराने आवेदन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न बघता वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा व आपली होणारी गैरसोय टाळावी.
  4. उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
  5. उमेदवाराने आपला आवेदन अर्ज जमा (Submit) करण्याआधी आपल्या अर्जामधील माहिती जसे कि नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, शैक्षणिक माहिती ई. व्यवस्थित वाचून मगच आपला आवेदन आज जमा करावा.
  6. नोकरी भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये उमेदवाराने स्वतःचे ओरिजनल आय डी सोबत ठेवावे.
  7. तसेच परीक्षेला जातांना ओरिजनल आय डी सोबतच हॉल तिकीटचे कलर झेरॉक्सही सोबत असू द्यावे.
  8. उमेदवाराने वर https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरूनच आपला आवेदन अर्ज पाठवावा.
  9. उमेदवाराने भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जात नाही म्हणून अर्ज करण्याआधी उमेदवाराने योग्य ती खबरदारी घ्यावी.
  10. अर्ज करत असतांना उमेदवाराने शक्यतो खूप पूर्वीचा फोटो वापरू नये. असे केल्याने उमेदवाराला आपली स्वतःची ओळख पर्यवेक्षक यांना पटवून देण्यात कदाचित अडचण येऊ शकते.
  11. उमेदवाराने स्वतःची सही आवेदन अर्जामध्ये अपलोड करतांना व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावी व ती सही लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
  12. आवेदन अर्ज सादर करतांना उमेदवाराने जो इ-मेल आयडी , लॉगिन पासवर्ड व मोबाईल नंबर ई. जी माहिती अर्जामध्ये नमूद केलेली असेल ती माहिती उमेदवाराने लक्षात ठेवावी. सदर माहिती उमेदवाराला भरतीच्या पुढील कोणत्याही टप्प्यामध्ये लागू शकते.
  13. संबंधित नोकरी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा सर्वस्वी अधिकार हा संभंधित नोकरी विभागाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
  14. उमेदवाराने आवेदन अर्ज करतांना अर्जामध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती नये,असे केल्यास संबंधित नोकरी विभागाकडून उमेदवाराचा आवेदन अर्ज रद्द केला जाईल व भरती प्रक्रियेमधून बाद केले जाईल.

बृहमुंबई महानगरपालिका स्थापना कधी झाली?

११ ऑक्टोबर १९८२ रोजी.



माहिती शेअर करा

Leave a Comment